क्राईम, जळगाव

डीमार्ट पार्कींगमधून दुचाकी चोरीप्रकरणी एकास अटक

शेअर करा !

jalgaonchor1

जळगाव प्रतिनिधी । डीमार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

याबाबत माहिती अशी की, गोविंदा एकनाथ वाणी (वय-५१) रा. सातगाव डोंगरी ता.पाचोरा हे आपल्या मुलीसोबत जळगावातील डिमार्ट येथे सामान खरेदी करण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता आले. त्यांनी दुचाकी क्रमांक (एमएच १९/ एटी ०९२२) पार्कींग झोनमध्ये लावली. त्यावेळी अज्ञात चोरट्याने पार्कींगमधून दुचाकी लंपास केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार डीमार्ट परीसरातून संशयित आरोपी राहुल गणेश महाजन (वय-२०) आणि अब्दुल हमीद चौक, तांबापूर या दोघांची केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची निदर्शनास आणून आले. यात दोघांना ताब्यात घेतले असून दुचाकी हस्तगत केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी स.फौ. अशोक महाजन, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, राहूल पाटील, अरूण राजपूत, रणजीत जाधव, विनोद पाटील, किशोर जाधव यांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.