क्राईम, राज्य

नागपुरात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला ; तीन महिलाही जखमी

शेअर करा !
acid attak
 

नागपूर (वृत्तसंस्था) सावनेर तालुक्यात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह अन्य तीन महिलाही जखमी झाल्या आहेत.

  • advt tsh flats
  • spot sanction insta

या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. डॉ. सोफी सायमा, गौरी सोनेकर आणि सुरेखा बंडे अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या डॉ. शुभ्रा जोशी, डॉ. सुकन्या कांबळे थोडक्यात बचावल्या आहेत. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. किशोर कान्हेरीया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे कळते.