क्राईम, यावल

यावल बसस्थानकावर मंगळसुत्र चोरीस गेल्याची पाचवी तक्रार दाखल

शेअर करा !

moharala bus

यावल, प्रातिनिधी । येथील बसस्थानकाच्या परिसरात मागील आठवडयात अज्ञात चोरटयांकडुन बसमध्ये प्रवास करणाऱ्या महीलांच्या सोन्याच्या मंगळसुत्रांच्या चार घटना घडल्या असतांना काल प्रवासी नागरीकांच्या सतर्कतेने व पोलीसांच्या दक्षतेमुळे दोन महीलांना पर्समधील पैसे चोरतांना रंगेहात पकडण्यात आले होते.

  • spot sanction insta
  • advt tsh flats

 

चोरीच्या आरोपाखाली बु्ऱ्हाणपुर मध्यप्रदेश मधील दोन महीलांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यामुळे मंगळसुत्र चोरीच्या तक्रारी वाढत आहे . याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ९ / ४ / २०२० रोजी सायंकाळी ५.३oवाजेच्या सुमारास कोरपावली तालुका यावल येथे राहणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश वसंत फेगडे यांच्या पत्नी सौ. भावना या यावल हुन मोहराळा येथे जाण्यासाठी बसमध्ये ( क्रमांक एम एच २०बीएल १४०३) बसल्या असतांना दोन अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळयातील चार ग्रॅमचे मंगळसुत्र तोडुन चोरल्याची घटना उघडकीस आली. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी त्या दोन चोरट्या महीलांना अटक करताच मंगळसुत्र पोत चोरीच्या तक्रारींची संख्या पाचवर पोहोचली आहे.