Home राजकीय सत्ता आपचीच, मात्र भाजपचीही मुसंडी; काँग्रेसची निराशाजनक कामगिरी

सत्ता आपचीच, मात्र भाजपचीही मुसंडी; काँग्रेसची निराशाजनक कामगिरी

0
116


नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीत आपचेच सरकार येणार असल्याचे कल समोर आले असले तरी या निवडणुकीत भाजपच्या संख्याबळात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचे कल आता स्पष्ट झाले आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुमारे सव्व दोन तासांनी आम आदमी पक्ष पन्नासच्या आत-बाहेर जागा मिळवण्याची शक्यता असून भाजपला १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दिल्लीत लागोपाठ तिसर्‍यांना आम आदमी पक्ष सरकार बनवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, गेल्या वेळेस ७० पैकी ६७ जागा जिंकणार्‍या आपला या निवडणुकीत थोडा धक्का बसला आहे. तर गेल्या वेळेसपेक्षा भाजपच्या संख्याबळात वृध्दी होणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound