जळगाव (प्रतिनिधी) पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून आज भाजपतर्फे पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले.
पुलवामा येथे काल झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे अवघा देश क्षुब्ध झाला आहे. याचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत असून पाकला धडा शिकवण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर, आज येथील भारतीय जनता पक्षातर्फे याचा तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यामागे पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना असल्यामुळे याप्रसंगी पाकच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर विविध घोषणांच्या निनादामध्ये पाकच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहा– पाकच्या राष्ट्रध्वज दहनाचा हा व्हिडीओ.