धुळे (प्रतिनिधी) काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धुळ्याचा उद्या होणारा नियोजित दौरा रद्द झाल्याचे वृत्त आहे. खुद्द भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी धुळे दौरा रद्द करण्याबाबत खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सूचना दिल्याचे समजते.
देशात असलेले गंभीर वातावरण लक्षात घेता भाजपातर्फे आगामी आठवडाभर कोणत्याही निवडणूक बैठका व प्रचार दौरे, सभा घेतल्या जाणार नाहीत, असेही समजते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळातील सभाही रद्द झाल्यात जमा असल्याचे कळते. दरम्यान,याबाबत प्रशासकीय पातळीवर अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय.