हिंगणघाट जळीतप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

4b8b0b87 e11e 4b7a a808 d5a6606897dd

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | वर्धा जिल्हयातील हिंगणघाट येथील प्राध्यापिका युवतीला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी येथील मुस्लिम समाजाने तहसीलदारांना आलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरातील सोमवारी नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात पायी जात असलेल्या प्राध्यापिका अंकिता या युवतीच्या अंगावर आरोपी विकेश नगराळे उर्फ विक्की याने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती युवती गंभीर भाजली असून टीव्ही प्रकृती चिंताजनक आहे. हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे मुक्ताईनगर येथील समस्त मुस्लिम समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो. या घटनेतील संबधित नराधमांला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी करतो.

या वेळी जळगाव मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, रामरहीम रिअल इस्टेटचे किशोर किसन पाटील, मुख्तार खान, शेख असगर शेख अकबर, उर्दू पत्रकार रिजवान चौधरी, शेख आसिफ शेख उस्मान, शेख वसीम कुरेशी, दतू सोनार, बाळू भगवान पाटील, सादिक खटीक, हुसेन शाह कलंदर शाह, हसन शाह कलंदर शाह, आदी उपस्थित होते.

Protected Content