Home क्राईम हिंगोणा येथील अपघातातील ‘त्या’ डंपरला जाळले ?

हिंगोणा येथील अपघातातील ‘त्या’ डंपरला जाळले ?


yawal news 1

यावल प्रतिनिधी । अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर हिंगोणा गावाजवळ रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरचे टायर फुटल्याने तो समोरून येणाऱ्या क्रुझर वाहनावर धडकला होता या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतील डंपर पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत आज सकाळी नागरीकांच्या लक्षात आला.

सदरची घटनाही भिषण दुर्घटना ही डंपरच्या चालक बाजुचा पुढील टायर फुटल्याचा कांगवा पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत करण्यात येत असतांनाच सदरचे डंपर कुणी पेटविले की पेटले हा विषय संपुर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. काल झालेल्या अपघाताने परिसरातील नागरीकांना सुन्न करून टाकले असुन, भविष्यात अशा प्रकारे चे अपघात होवु नये याची काळजी घेणे सर्वांसाठी अत्यंत गरजे असल्याची प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करीत आहे.


Protected Content

Play sound