नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर बाजार सुरु होताच घसरण पहायला मिळाली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेअर बाजारावरही याचे सावट असून अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला असून निफ्टीची १२६.५० अंकांची घसरण झाली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसते. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला आणि ४०,५७६ वर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी १२६.५० अंकांनी कोसळला आणि ११,९१० वर स्थिरावल्याचा पहायला मिळाला.