जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहाडी येथील दोन आग पीडितांचा संसार शिवसेनेने उभा करून दिला असून सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी मदतीसाठी धाव घेत या दोन कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य तसेच रोख पाच हजार रुपयांची मदत केली. सरकारी मदतीची वाट न पाहता शिवसेनेने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या मदतीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोहाडी येथील जगन्नाथ बाविस्कर व गोरख कोळी यांच्या पत्र्याच्या घराला 3 फेब्रुवारी रोजी शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले होते. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने बाविस्कर व कोळी कुटुंब उघड्यावर आले होते ही माहिती समजताच शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान मुंबई येथील कामकाज आटोपून जळगावात येताच राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने मोहाडी येथे जाऊन जगन्नाथ बाविस्कर व गोरख कोळी यांच्या कुटुंबाची भेट घेतली या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या तर्फे संसारोपयोगी साहित्य भांडी अन्नधान्य तसेच प्रत्येकी रोख 5 हजार रुपयाची मदत राज्यमंत्री पाटील यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,जेष्ठ पदाधिकारी गिरीधर सपकाळे, सुकलाल सोनवणे, रमेश अप्पा सपकाळे, उपसरपंच भगवान पाटील,अशोक सपकाळे, गणेश पाटील, भैय्या सोनवणे,संदीप ठाकरे, राजू सपकाळे,योगेश बाविस्कर, सचिन सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.