संघाकडून 2024 मध्ये संविधान बदलण्याचा कट : प्रकाश आंबेडकर

जळगाव (प्रतिनिधी) राफेल विमान घोटाळा हा एक मोठा घोटाळा असून भाजप हे एका कंपनीला मदत करणार सरकार आहे.  हे सरकार भ्रष्टाचार विरोधी असल्याचे म्हणते, मात्र राफेर करारातून भ्रष्टाचाराचाच क्लॉज वगळते.आरएसएस 2024 मध्ये संविधान बदलणार आहे. संविधान का बदलणार हे मात्र,ते स्पष्ट करत नाही. त्यांना मनुवादी संविधान हवे असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते आज जळगाव येथे पत्रकाराशी बोलत होते.

 

राफेल हा एक मोठा घोटाळा आहे. एका कंपनीला मदत करणारा करार आहे. कॅगच्या रिपोर्टमध्ये स्पेअर पार्ट लागणारी किंमत वगळण्यात आली आहे. सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे म्हणते, मात्र भ्रष्टाचाराचा क्लॉज या करातून वगळण्यात आला आहे. राफेल विमान खरेदीमध्ये दलाली अनिल अंबानी मार्फत झाली आहे, असाही आरोपही त्यांनी लगावला. या करारात फ्रान्स सरकारचा काहीही रोल नाही. संरक्षण खात्याने साहित्य खरेदी करताना त्या-त्या देशांमध्ये करार होत असतो. मात्र, या करारात तसे झालेले नाही, असेही ते म्हणाले. मनमोहन सिंग सरकारने 125 राफेल विमान खरेदीचा करार केला होता. मात्र, मोदी सरकारने 125 विमान खरेदी केली नाहीत, याचा खुलासाही त्यांनी केला पाहिजे. राफेल विमानाच्या कॉलिटी बद्दल शंका नाही. गॅरंटी नसल्यामुळे मात्र,विमान उड्डाण हा एक मोठा प्रश्न आहे. तसचं विमान नादुरुस्त झाल्यास युद्धाच्या वेळी वापर करण्याची वेळ आल्यास, त्याची गॅरंटी नसल्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

काँग्रेस व आमच्यात गेल्या चार महिन्यापासून चर्चा सुरू आहे. मात्र, एका अजेंड्यावर स्पष्टता होत नसल्यामुळे पुढील बोलली थांबली आहे, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणणार की नाही ? या मुद्द्यावर अजून कॉंग्रेसकडून उत्तर आलेले नाही. आमच्यात जागांचा विषय नाहीय.काँग्रेस ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त वेळेस पराभूत झाली असेल ती जागा आम्हाला द्या, अशा त्यांना 12 जागा आम्ही मागितल्या आहेत.

देशभरात विधी केला विरोध करणारे सर्व पक्ष एकत्र येत आहे. काँग्रेसनेही ऐकले असते तर, ते आज चांगल्या स्थितीत असते. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही, मात्र त्यामध्ये असलेली चीप मेनूक्युलेट होऊ शकतो असा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. याचं उदाहरण देताना ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये मशीनद्वारे बीजेपीचा उमेदवार निवडला गेला होता, मात्र पेपर वोटिंग मध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.यावर ईव्हीएम मशीन जरी मॅनिप्युलेट होत नसली तरी त्यामधील चीफ ही मॅनिप्युलेट होत असते, हे या घटनेने सिद्ध झाले आहे. आर.एस.एस.ने भूमिका घेतली आहे की, 2024 मध्ये संविधान बदलणार आहे. मात्र संविधान का बदलणार? हे त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही. त्यांना मनुवादी संविधान आणायचे आहे. त्यामुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणणे जरुरी आहे, असेही प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Add Comment

Protected Content