Home Cities मुक्ताईनगर पोलिस पाटील संघटनेच्या तालुका सचिवपदी वाघ; प्रसिद्धी प्रमुखपदी चौधरी

पोलिस पाटील संघटनेच्या तालुका सचिवपदी वाघ; प्रसिद्धी प्रमुखपदी चौधरी

0
48


police patil mutainagar
police patil mutainagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी। पोलीस पाटील संघटनेच्या तालुका सचिवपदी अनिल वाघ तर प्रसिध्दी प्रमुखपदी संजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

पोलीस पाटील संघटनेची तालुका बैठक संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दीपक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व तालुक्यातील जेष्ठ पोलीस पाटील समाधान भोंबे, वसंत वाघमारे, किशोर मेढे, सौ.बेबीबाई वाघ,सौ.शकुंतला ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी मतदार दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व पोलीस पाटलांना शपथ दिली. या सभेमध्ये दीपक चौधरी यांनी जिल्ह्यावर होऊ घातलेल्या जिल्हा मेळावा विषयी नियोजन करून मेळाव्याचे महत्व पटवून दिले व तालुक्यातून निधी बाबत कल्पना मांडली असता सर्वानुमते प्रत्येकी ५०० रु देण्याचे ठरवले. तालुका खजिनदार दिलीप पाटील व तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका कार्यकारिणीतील तालुका सचिव व प्रसिद्धी प्रमुख यांनी स्वमर्जीने राजीनामा दिला असता त्यावेळी त्यांचे जागी तालुका सचिव पदी अनिल वाघ व तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी संजय चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले व आभार अनिल वाघ यांनी मानले.


Protected Content

Play sound