भुसावळ प्रतिनिधी । ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे, रजनी सावकारे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी हे होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेतील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळच्या स्नेह संमेलनाचा मुख्य विषय सामाजिक व्यवस्था व पर्यावरण हे होते. ज्यावरती शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या काही नाटिका व नृत्य सादर केले. ज्याला उपस्थित सर्व पालक प्रेक्षक वर्गांनी भरभरून दाद दिली. स्नेह संमेलनाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका पॅट्रेशिया हॅसेट व श्रध्दाली घुले यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका निना कटलर यांनी केले. स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.