१२ वी पास व्यक्ती पुन्हा पंतप्रधानपदी नकोच : केजरीवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. आता २०१९ मधील निवडणुकीत जनतेने ही चूक सुधारावी. आता एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्यावी, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

 

दिल्लीत बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांच्या सभेतून भाजपा आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांनी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केले. केजरीवाल म्हणाले, गेल्यावेळी तुम्ही १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. यंदा या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. १२ वी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत पार पडलेल्या या सभेत ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू आदी नेते उपस्थित होते. केजरीवाल पुढे म्हणाले, १४ एप्रिल २०११ रोजी जंतर मंतरवरील ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर देशातील जनतेने तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून हटवले होते. त्याच पद्धदतीने आता या सभेनंतर जनता मोदी सरकारला उखाडून फेकणार, असे त्यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content