शिरसोली ते शिर्डी साईबाबा पदयात्रेचे कासोदा येथे जल्लोषात स्वागत (व्हिडिओ)

kasoda padyatra

कासोदा, प्रतिनिधी | सालाबदप्रमाणे गेल्या ११ वर्षांपासून निघणाऱ्या शिरसोली ते शिर्डी पदयात्रेचे मंगळवारी (दि.२१) येथील रहिवाशी कैलास अग्रवाल यांच्याकडे आगमन झाले. त्यावेळी साईबाबांच्या पालखीसह साई भक्तांचे फटाके फोडून, रांगोळ्या काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

तसेच कैलासबाबा यांच्या राहत्या घरी स्वागतानंतर श्री साईबाबांची अग्रवाल दाम्पत्याच्या हस्ते आरती करण्यात आली व पादुका पूजनही करण्यात आले. कैलास अग्रवाल यांचा जन्मदिवस असल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक त्याच स्थळी कापला व महिलांनी त्यांना औक्षण केले. पदयात्रेत आलेल्या व पंचक्रोशीतील साईभक्तांना महाप्रसादही देण्यात आला. त्याप्रसंगी कासोदा पोलिस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव, माजी जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, अनेक नागरिक उपस्थित होते. आज (दि.२२) पहाटे पालखी शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

 

 

Protected Content