धाबे जि.प.शाळेतील मुख्याध्यापकाचा कौतुकास्पद उपक्रम

parola 2

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापकांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या एका गरजू मुलीला स्वखर्चाने बुट देवून एक आदर्श निर्माण केला आहे. मुख्यध्यापकांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

तालुकयातील धाबे येथील जि.प. शाळेच्या मागे राहणाऱ्‍या निराधार व विधवा महिलेची नात सुनंदा भिल आपल्या आजीसोबत राहते. तिचे आईवडील हे उसतोडण्याचे काम करत असल्याने इतर मजुरांसोबत परजिल्ह्यात गेले असल्याने त्यांनी मुलीला आजीकडे राहण्यासाठी सोडले होते. दरम्यान मुलगी आपल्या आजीसोबत दररोज शेतात जात होती. त्यावेळी अनेकदा जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षण गुणवंतराव पाटील यांनी तीची चौकशी केली. तिला कमी ऐकू येत आणि तिला त्यामुळे शाळेतील इतर मुले देखील चिडवतात त्यामुळे ती शाळेत येत नाही अशी माहिती तिच्या आजीने शिक्षकांना सांगितले. दरम्यान मुलगी व आजीची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिच्या पायात चप्पल किंवा बुट नसल्याचे मुख्याध्यापकांच्या लक्षात आले. त्यांनी स्वखर्चाने मुलीचा बुट आणि मोजे आणून तिला देवून शाळेत पाठवा अशी विनंती तिच्या आजीला केली.

यावेळी मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले सध्या ३ जानेवारी पासुन लेक वाचवा लेक शिकवा अभियान सुरू आहे. आज एका गरीब व कर्णबधिर दिव्यांग बालिकेला अल्पशी का असेना मदत करुन आनंद व सन्मान मिळवुन दिला हेच मोठे समाधान आहे. लेक वाचवा लेक शिकवा हा फक्त सप्ताह किंवा मास पुरते मर्यादित न ठेवता सदैव याबाबत प्रयत्न प्रेरणा व जागृती आणि उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत.

Protected Content