मुक्ताईनगर नगरपंचायत चारही सभापतींची निवड बिनविरोध

Muktainagar News 1

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत विषय समितीच्या सभापती निवडणुक उत्साहात पार पडली. यावेळी चारही सभापती यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

मुक्ताईनगर सकाळी 10 ते 12 दरम्यान पीठासीन अधिकारी स्थायी समिती विषय समिती सदस्य श्याम वाडकर यांनी विषय समिती निहाय नामनिर्देशपत्र दाखल झालेली वाचून दाखविली व ती वैद्य यथोचित रित्या भरलेली असल्याचे सभागृहात श्याम वाडकर यांनी सांगितले.

स्वच्छता वैद्यकीय आणि सर्व आरोग्य समिती सभापतीपदी शमीमबी अहमदखान, महिला बालकल्याण समिती सभापती नुसरत बी महबूब खान, पाणी पुरवठाव जलनिस्सारण समिती सभापती संतोष प्रल्‍हाद कोळी, तर शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती बिलकीसबी आसिफ बागवान यांची या पदांवर बिनविरोध निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मुक्ताईनगर यांनी घोषित केले
. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत एक स्थायी समिती व 5 विषय समित्या राहतील त्याचप्रमाणे स्थायी समितीत नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतील तर उर्वरित सदस्य हे विषय समितीचे सभापती असतील असेही पीठासीन अधिकारी श्याम वाडकर यांनी सांगितले.

Protected Content