खुबचंद साहित्यांवर प्राणघातक हल्ल्यातील संशयितांची ओळख पटली

Crime 1

जळगाव प्रतिनिधी – बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आरएच आणि गिरजाई जिमखान्यात गुरुवारी रात्री घडली होती. या प्रकरणातील इतर संशयितांची ओळख पटली असून त्यांच्या नावाची गुप्तता पोलिसांकडून पाळण्यात येत आहे. दरम्यान २० रोजी या प्रकरणी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, माजी नगरसेवक राजु आडवानी आदींची शहर पोलिसात चौकशी करण्यात आली.

शहरातील आर.एच. आणि गिरजाई जिमखान्यात गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास खुबचंद प्रेमचंद साहित्या यांना मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या पासून संशयित अरोपी फरार आहेत.

काय आहे हा प्रकार ?
शहरातील आर.एच. आणि गिरजाई जिमखान्यात गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास खुबचंद प्रेमचंद साहित्या हे गेम खेळण्यासाठी गेले असता त्यांच्यावर काहींनी हल्ला चढवित मारहाण करत गंभीर जखमी केले होते. घटनास्थळावरुन मारेकऱ्यांनी पळ काढला होता. याचेवेळी पुरावे नष्त करण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी जिमखान्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चक्क डीव्हीआरच काढून नेत ते जिमखान्यच्या आवारात फेकले होते.

सीसीटीव्ही फुटेज तपासले
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मारेकऱ्यांनी जिमखान्याच्या परिसरात फेकलेला डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेत पाहणी केली असता मारहाणीची संपुर्ण घटनेचे फुटेज आढळून आले. यात मारेकरी दिसत असून या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास चक्र फिरवित संशयितांची ओळख पटवित त्यांचे नाव, पत्ता आदी माहिती मिळविली आहे. मात्र संशयितांची नावांची गुप्तता पोलिसांकडून पाळण्यात येत असून फरार आरोपिंचा शोध सुरु आहे.

Protected Content