जळगावात वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

40008764 c1a7 450e a002 ff8996622228

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगरात आजाराला कंटाळून एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

या संदर्भात अधिक असे की, देविदास बाबुराव पाटील (वय 65 रा. शांती निकेतन कॉलनी, अयोध्या नगर) या वयोवृद्ध ने यांना अनेक दिवसांपासून कॅन्सरचा आजार होता. राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या भिंतीच्या आसारीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल अशोक संगत, चेतन सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन त्याचे मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार संभाजी पाटील करीत आहे.

Protected Content