यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दगडी मनवेल या गावातील दाम्पत्याला जातीवाचक शाब्दीक चकमक व मारहाण केल्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहीती अशी की दगडीमनवेल ता. यावल येथील राहणारे शाम जगदीश भिल यांच्या पत्नी दिनांक १० फेब्रुवारी रोजी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी गजानन पाटील यांच्या घरा जवळुन जात असतांना त्यांच्या पत्नीला गटारीच्या विषयावरून विचारपुस करण्यात आली. यातुन वाद उत्पन्न होवुन शाम जगदीश भिल हा जाब विचारण्यास गेले असता गावातील ज्ञानेश्वर ढोलु पाटील, संजु ढोलु पाटील, विकास पाटील, वासुदेव पाटील, सुनिल पाटील, यांनी शाम भिल व त्यांच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
याबाबत शाम जगदीश भिल यांनी यावल पोलीसात फिर्याद दाखल केल्याने ज्ञानेश्वर पाटील, ढोलु पाटील, विकास पाटील, वासुदेव पाटील, सुनिल पाटील, सर्व रा. दगडी मनवेल ता. यावल यांच्या विरूद्ध अनुसुचीत जाती अत्याचार कलम३/१/१०/ भा.द.वी. कलम१४३, ३२३, ५०४, ५०६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तपास विभागीय पोलीस अधिकारी राजेन्द्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.