Home राजकीय नागपूर जि.प.निवडणूक : गडकरींच्या मूळ गावाच्या गटातून कॉंग्रेसचा उमेदवार विजयी

नागपूर जि.प.निवडणूक : गडकरींच्या मूळ गावाच्या गटातून कॉंग्रेसचा उमेदवार विजयी

0
112

images 1
 

नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जबरदस्त धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा गटातून येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधूनही काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत.

 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आहेत.त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उस्तुकता आहे. राज्यातील सहा नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निकाल यायला आज सकाळी १० वाजेपासून यायला सुरुवात झाली आहे. प्राथमिक आलेल्या निकालानुसार धुळे जिल्हा परिषद वगळता. भाजपला अनेक ठिकाणी फटका बसलेला आहे. धक्कादायक म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.


Protected Content

Play sound