Home क्राईम राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तीन ठार

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तीन ठार

0
29

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि लक्झरी बसच्या धडकेत तीन जण ठार झाले असून दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जी.जे. १९ एक्स९५९५ या क्रमांकाची लक्झरी बस जळगावकडे जात असतांना विरूध्द बाजूने येणार्‍या ट्रकने लक्झरीला जोरदार धडक दिली. यामध्ये तीन जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावरील गोदावरी कृषी महाविद्यालयाजवळ घडली. मृतांमध्ये लक्झरी व ट्रकचालक राजाराम गेनाराम चौधरी आणि शंकर पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. तर एका प्रवाशाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound