‘जेएनयू’तील हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने स्वीकारली

ENqS cCVAAEnbnc

दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रविरोधी घटनेचे केंद्र जेएनयू बनल्यामुळे हा हल्ला आपणच घडवून आणल्याचे म्हणत हिंदू रक्षा दलाच्या पिंकी चौधरीने हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

जेएनयूमधल्या रविवारच्या हिंसाचारानंतर अजूनही दिल्ली पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. सध्या सुमारे ७०० हून अधिक पोलिस जेएनयू परिसरात तैनात करण्यात आलेत. दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनाच्या अध्यक्षा आएशी घोष हिच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जेएनयूमधल्या हल्ल्यावरुन एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालते. त्याचवेळी या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने घेतली आहे.

Protected Content