Home Cities जळगाव पत्रकार संघातर्फे सोमवारी व्याख्यान

पत्रकार संघातर्फे सोमवारी व्याख्यान

0
28


 

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा पत्रकार संघातर्फे सोमवार ६ जानेवारी रोजी स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात येणार असून यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत महनीय वक्ते यांची वैचारिक मेजवानी संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

सोमवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यानंतर पत्रकारदिनानिमित्त सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथील सुशील कुलकर्णी यांचे ‘पत्रकारितेचे बदलते स्वरूप व प्रवाह’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयबापू पाटील असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून कबीनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील, खा. उन्मेश पाटील, खा. रक्षा खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, आ. शिरीष चौधरी, आ. लता सोनवणे, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. अनिल पाटील, आ. किशोर पाटील, आ. चंदुलाल पटेल, आ. चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, आ. स्मिता वाघ, अशोक जैन, डॉ. प्रा. पी. आर. चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत.


Protected Content

Play sound