Home Cities अमळनेर कळमसरे उपसरपंचांनी केले नुतन जिल्हाधिकाऱ्यांचे दिले स्वागत

कळमसरे उपसरपंचांनी केले नुतन जिल्हाधिकाऱ्यांचे दिले स्वागत


अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील कळमसरे येथील उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी आज नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना कळमसरे येथील रामनाम पांझर तलावाला भेट देण्याचे आमंत्रणही दिले, त्यांनी ते स्वीकारले आहे.

मावळते जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कळमसरे येथील रामनाम पांझरा तलावासाठी मोलाचे सहकार्य केले होते, तसेच कळमसरे गावाला भेट देऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला होता. त्यावेळी गावातील लोकांनी एकजूट पाहून त्यांनी कौतुकही केले होते. त्यांचाही यावेळी निरोप म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर नेवे, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व खानदेश माळी महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गजानन महाजन, अशोक खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound