जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळ्यातील मढी चौकात झन्नामन्ना खेळणाऱ्या पाच जणांवर रामांनद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचही जणांना आज न्यायालयात हजर केले असता सर्वांनाप्रत्येकी 300 रूपये दंड आणि न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, 1 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास शहरातील पिंप्राळा भागातील मढी चौकात संशयित आरोपी समाधान आण्णा भोई हा इतर चार ते पाच जणांसोबत झन्नामन्ना खेळत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोउनि रोहिदास ठोंबर, पोहकॉ वासुदेव मोरे, पो.कॉ. गणेश देसले, होमगार्ड रविंद्र सोनवणे यांनी पिंप्राळा येथे मढी चौकातील मरीमाता मंदीराजवळ झन्नामन्ना खेळतांना छापा टाकून समाधान अण्णा कोळी (वय-30)रा. मढी चौक, पिंप्राळा, दिपक ज्ञानेश्वर कोळी (वय-24) रा.मढी चौकाच्या पुढे, पिंप्राळा, निलेश चंद्रकांत ठाकुर (वय-27) रा. पिंप्राळा धनगर वाडा, अक्षय अजय चव्हाण (वय-19) रा. मढी चौक पिंप्राळा आणि विक्की नरेश कोळी (वय-20) रा. पिंप्राळा यांना अटक करत त्यांच्या ताब्यातील 1295 रूपये रोख आणि झन्नमन्ना खेळण्याचे साहित्य जप्त केले होत. पाचही जणांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यात न्यायालयाने पाचही जणांना प्रत्येकी 300 रूपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली.