पुणे (वृत्तसंस्था) सत्ता बदलल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्याचा फायदा घेऊन काही लोकांचा कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. परंतू आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विजयी स्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, काेरेगाव भीमा येथील जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही १ जानेवारी राेजी देशभरातून लाखाे अनुयायी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या गावात व परिसरात कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. दाेन वर्षांपूर्वी घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आता दरवर्षी कडेकाेट सुरक्षा तैनात केली जाते. कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे भीम सागर उसळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनीही विजयी स्तंभाला अभिवादन केले. सत्ता बदलल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोकांचा आज दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. पण सत्ताधाऱ्यांसोबत बसून आम्ही हा डाव उधळून लावला आहे, असे आंबेडकर म्हणाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले.