Home राष्ट्रीय पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आग

पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आग

0
46

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ रात्री किरकोळ आग लागल्याने थोडा वेळ खळबळ उडाली. मात्र अग्नीशमन पथकाने आगीला लागलीच आटोक्यात आणले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असणार्‍या ७ लोकल्याण मार्ग येथे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. लागलीच अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग पंतप्रधान निवासस्थानी किंवा कार्यालय स्थळी लागलेली नसून एसपीजी रिसेप्शन भागात लागली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे. ही आग बर्‍यापैकी आटोक्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


Protected Content

Play sound