यावल, प्रतिनिधी | तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रास घातक रसायनाव्दारे तयार करण्यात आलेली गावठी हातभट्टीची दारू विक्री जात असुन या संदर्भात तालुक्यातील महिलांनी अनेक वेळा दारू विक्री विरोधात मोर्चे काढुन आंदोलनही केले आहे. मात्र हे धंदे बंद झालेले नाहीत. येथील तालुका पोलीस निरिक्षकांनी तत्काळ याची दखल घेत आज सकाळी पोलिसांनी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.
अधिक माहिती अशी की, येथील पो.नि. धनवडे यांनी गेल्या दोन दिवसात केलेल्या विविध प्रकारच्या कारवाईमुळे आपल्या कार्यपद्धतीने सर्वसामान्यांचे लक्ष वेधले आहे. यातच आज (दि.२९) सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास त्यांनी अंजाळे शिवारातील तापी नदीच्या काठावरील बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीचे एकुण सहा बॅरेल भरलेले कच्चे-पक्के रसायन ११०० लिटर, तयार केलेली जवळपास ४० ‘लिटरची गावठी दारू अंदाजे ३० हजार रुपये किमतीची दारू सॅंपल जप्त केले आहे. या ठिकाणी गावठी दारू तयार करून विकणारे दोघे मात्र पळुन जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. पो.नि. धनवडे यांच्या मार्गदर्शना पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी या कारवाई भाग घेतला. या कारवाईचे महिलाकंडुन स्वागत करण्यात येत आहे.