अलमाटी वृत्तसंस्था । कझाकिस्तानातील अलमाटी शहरात आज सकाळी झालेल्या अपघातात नऊ प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहे. या विमानात ९५ प्रवासी व पाच क्रू मेंबर होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे विमान कझाकिस्तानची राजधानी नूर सुलतानच्या दिशेनं निघालं होतं. उड्डाण भरत असतानाच पायलटचं नियंत्रण सुटल्यानं विमान संरक्षक भिंतीवर तोडून एका इमारतीवर जाऊन आदळलं, अशी माहिती कझाकिस्तानच्या नागरी उड्डाण समितीनं दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.