Home Cities जळगाव जळगावात महिलेच्या पर्समधुन सोन्याची पोत लंपास; गुन्हा दाखल

जळगावात महिलेच्या पर्समधुन सोन्याची पोत लंपास; गुन्हा दाखल


sambhaji nagar chori

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये बाजाराच्या निमित्ताने आलेल्या महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रणाली महेश भावसार (वय-35) रा. रिंगरोडा फॉरिस्ट कॉलनी या बाजारात दिरानी यांच्यासोबत आल्या होत्या. त्यांनी शाहुनगर येथून रिक्षात बसून फुले मार्केटपर्यंत आले. रिक्षातून उतरल्यानंतर त्यांना सोन्याची पोत गाठायची होती. त्यासाठी त्यांनी तुटलेली पोत पर्समध्ये ठेवलेली होती. दीरानी यांना पर्स घेतल्यानंतर दोघे जण स्वेटर घेण्यासाठी फुले मार्केटच्या दुसऱ्या गल्लीत गेल्यानंतर स्वेटरसाठी 500 रूपये वरती काढून ठेवून असा विचार प्रणाली यांनी केला. त्यावेळी पर्समधील ठेवलेले पैसे आणि 14 ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शहर पोलीसात धाव घेवून घटनेची माहिती दिली. पर्समधून 16 हजार 800 रूपयाचे 14 ग्रॅम सोने, तीन हजार रूपये रोख असे एकुन 19 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय निकुंभ करीत आहे.


Protected Content

Play sound