धरणगाव, प्रतिनिधी | खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले आ. गुलाबराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ याचा नेतृत्वाने व कार्याने प्रभावीत होऊन तसेच शिवसेना जिल्हा उपप्रमुख पी.एम. पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पु भावे, युवासेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ व संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते पापाशेट वाघरे व परमेश्वर महाजन यांनी आज (दि.१०) अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे धरणगांव नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्याचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये परमेश्वर महाजन हे नुतन विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन भगवान भादु महाजन यांचे सुपुत्र आहेत. पापा सेठ वाघरे हे भाजपाचे युवामोर्चा शहर उपाध्यक्ष होते. याशिवाय रामभाऊ महाजन, दीपक महाजन, संजय पचेरवाल, नितिन चंडाले, गोलू पचेरवाल, कार्तिक करोसिया, प्रवीण पचेरवाल, प्रल्हाद पचेरवाल, अक्षय पचेरवाल, परेश पचेरवाल, सागर पचेरवाल, पवन पचेरवाल, सूरज पचेरवाल, विक्की चंडाले, विसुनाथ वाघरे, राहुल नकवाल, राज पैठनकर, कुंदन चंडाले, सारंग वाघरे, भोला वाघरे, संतोष नकवाल व अनिल नकवाल यांचा समावेश आहे. या सगळ्यांचे आ.गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.