Home अर्थ पेट्रोलच्या दराने गाठली वर्षभरातील उच्चाकी पातळी ; डीझेलही महागले

पेट्रोलच्या दराने गाठली वर्षभरातील उच्चाकी पातळी ; डीझेलही महागले


petrol
 

मुंबई (वृत्तसंस्था) पेट्रोलच्या दराने आज वर्षभरातील उच्चाकी पातळी गाठली आहे. पेट्रोलच्या दरात ९ पैसे वाढ झाली असून, डिझेल २६ पैशांनी महागले आहे.

 

मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८० रूपये ६५ पैशांवर पोहोचला आहे तर डिझेल ६९ रूपये २७ पैसे प्रति लीटर या दराने विकले जात आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूच्या तुलनेत मुंबईकरांना पेट्रोलसाठी सर्वाधिक फटका बसत आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५ रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर ६६.०४ रूपयांवर आहे. रविवारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी इंधनदरात कोणतीही वाढ केली नव्हती. सोमवारी मात्र यात वाढ करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound