Home राजकीय काँग्रेसमध्ये आले तर खडसेंचे स्वागतच : बाळासाहेब थोरात

काँग्रेसमध्ये आले तर खडसेंचे स्वागतच : बाळासाहेब थोरात


 

khadse and thorat
 

नाशिक (वृत्तसंस्था) एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता नेतेपदाला पोहोचतो. यात त्याचा खूप वर्षाचा संघर्ष,कष्ट आणि पक्षासाठी योगदान असते. भाजप सत्तेत येण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्याच्यावर अशी परिस्थिती येणे हे अत्यंत दुर्देवी आहे. जर ते काँग्रेसमध्ये आले तर अशा व्यक्तीचे आम्ही स्वागतच करु, असे विधान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 

भाजप सत्तेत येण्यामागे नाथाभाऊंचे मोठ योगदान राहिले आहे. कारण ते विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात होते. त्यावेळी आम्ही सत्तेवर होतो. त्यांचे काम अत्यंत प्रभावी असे आहे. पण त्यांना एकंदर जी वागणूक दिली गेली. ती सर्वसामान्य माणसाला ही न आवडण्यासारखी आहे. पण आता त्यांचा खूप रोष आहे ही वस्तूस्थिती आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. तर त्यांच्यावर येणारी ही वेळ येणे दुर्देवी असल्याचेही थोरात यावेळी म्हणाले.


Protected Content

Play sound