जळगाव प्रतिनिधी । येथील अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधून आज माजी पोलीस व सैन्यदलातील जवानांनी पथसंचलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
आज सायंकाळी माजी पोलीस कर्मचारी व कर्मचारी तसेच सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचार्यांनी पथसंचलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्थानकाजवळील पुतळ्याला मानवंदना दिली. समता सैनिक दलाच्या धरतीवर करण्यात आलेले पथसंचलन आणि मानवंदना पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पथसंचलनातून दिलेल्या अनोख्या मानवंदनेचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2547936621992547