जळगाव प्रतिनिधी । एम. जे. कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अश्लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आशा बाबा कॉलनीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणी एम.जे. कॉलेज जवळील एमएस-सीआयटी क्लासला दुपारी 12 वाजता जाते. गेला आठ दिवसांपासून संशयित आरोपी देवेन सोनवणे रा. वाघ नगर, जळगाव याने तिचा पाठलाग करून तिचा हात पकडून, तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्यावर बलात्कार करेन, तसेच तू जर लग्न केले नाही तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, तसेच जमले लग्नही मोडून टाकेल अशी धमकी दिली. विद्यार्थिनीच्या आई-वडिलांना वारंवार फोन करून अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी देवेन सोनवणे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.