जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिकेतर्फे आज बुधवार दि.४ रोजी मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली. या शिबिराचा जवळपास ४०० ते ४५० गरजूंनी लाभ घेतला.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मेहरूण साईबाबा मंदिर येथे बुधवार ४ डिसेंबर रोजी गरजू व्यक्तींना मोफत औषध उपचार करण्यात आला. शिबिराचा परिसरातील गरजु ४००, ४५० जणांनी लाभ घेतला. शिबिराला डॉ. मनीषा उगले , डॉ. युद्धिष्ठिर इंगळे, डॉ. रूपाली बेंडाळे, डॉ. पल्लवी पाटील, शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांचे अनमोल सहकार्य मिळाले.