Home Cities जळगाव रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंना मुद्दाम पाडण्यात आले ; खडसेंचा खळबळजनक आरोप

रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंना मुद्दाम पाडण्यात आले ; खडसेंचा खळबळजनक आरोप


eknath khadse

जळगाव (प्रतिनिधी) भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडले असल्याचा असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

सोमवारी पत्रकारांशी बोलतांना खडसेंनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानुसार अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्यासह पंकजा मुंडेंना पाडण्यात आल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. याबाबत पुरावे गोळा करुन वरिष्ठांना दिले आहेत. तसेच पाडापाडीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत पुरवण्यात आल्याचे पंकजांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणे आहे. याशिवाय रोहिणी खडसे यांच्याविरोधात तर भाजपचे कार्यकर्ते उघडपणे विरोधात काम करत होते, त्यांची नावं मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, मी कारवाईची वाट पाहात आहे, असे खडसे म्हणाले.


Protected Content

Play sound