जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीनगरातील रहिवासी सेवानिवृत्त कर्मचारी राहूल जगदे हे त्यांच्या पत्नी सोबत वास्तव्यास आहेत. २० नोव्हेंबर रोजी ते धुळे येथे कुटूंबासह नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत सोन्याची अडीच तोळे वजनाची ७५ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. दि.१ डिसेंबर रोजी श्री जगदे हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच कूलूप देखील तुटलेले दिसुन आले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त करून फेकला होता. सतेच बेडरूम मधील कपाट देखल उघडे होते व त्यांतील सामान देखील अस्ताव्यत केल्याचे आढळून आले. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी सामानाची तपासणी केली असता बेडरूम मधील भिंतीला हुकाला लटकविलेल्या कापडी पिशवीत ठेवलेली सोन्याची पोत आढळून आली नाही. या घटनेची माहिती त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिली. माहिती कळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. या चोरप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी हे करीत आहेत.