Home Cities पाचोरा सु.भा. पाटील विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

सु.भा. पाटील विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

0
33


पाचोरा प्रतिनिधी । येथील सु.भा. पाटील विद्यालयात बहर-२०१९ हे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले.

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पा. ता. सह.संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन जगदीश बापूराव सोनार, जेष्ठ संचालक दुष्यंत रावळ, प्राचार्य बी.एन. पाटील, अनिल येवले, भोसले सर मुख्याध्यापक एन ए सोनवणे, जेष्ठ शिक्षक अशोक परदेशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थांनी आपल्या विविध कला गुणदर्शनाची चुणूक सादर केली.त्यात फॅन्सी ड्रेस,नाटिका,गितगायन,सामूहिक नृत्य अशा अनेक बहारदार कार्यक्रमांची यामध्ये रेलचेल होती. याप्रसंगी पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता.सुत्रसंचलन ईश्‍वर पाटील, श्रीमती जयश्री पाटील, संदीप वाघ,श्रीमती चारुशीला पाटील, राहुल वाघ,श्रीमती सारिका पाटील यांनी केले. तर आभार संदीप शेवरे सरांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound