तज्ञ संचालकपदी कविता ठाकरे यांची निवड

अमळनेर ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था जळगांवच्या तज्ञ संचालकपदी पारोळा येथील बालाजी विद्यालयाच्या उपशिक्षिका कविता भीमराव ठाकरे यांची पतसंस्थेच्या अध्यक्षा सरला पाटील, उपाध्यक्ष प्रशांत साखरे व संचालक मंडळाने तज्ञ संचालक म्हणून निवड केली आहे.

कविता ठाकरे ह्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांना त्यांच्या माहेरी वडील भीमराव ठाकरे व सासरे कै. वसंतराव पाटील दोघे शिक्षक होते. यांच्याकडून त्यांना शिक्षकी पेशाचा वारसा लाभला आहे. त्यांच्या निवडीबद्दल महासंघाचे राज्य सचिव अशोक मदाने, सदस्य टी.के.पाटील व बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, अमळनेर तालुका खाजगी प्राथमिक महासंघाचे अध्यक्ष आशिष पवार व सचिव स्वप्नील पाटील, सानेगुरुजी विद्यामंदिर अमळनेर, बालाजी विद्यालय पारोळा येथील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Add Comment

Protected Content