Home राजकीय गोडसे देशभक्त वक्तव्याबद्दल प्रज्ञा ठाकूर यांचा माफीनामा

गोडसे देशभक्त वक्तव्याबद्दल प्रज्ञा ठाकूर यांचा माफीनामा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार लोकसभेत करणे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चांगलेच महागात पडले होते. विरोधकांनी ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते, असे म्हणत साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

 

‘विशेष संरक्षण गट’ (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान ‘डीएमके’चे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचे उदाहरण दिले. ‘विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली’ हे राजा यांनी सभागृहात सांगितले. परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत ‘तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये’, असे म्हटले होते. यानंतर मात्र, सभागृहात एकच गोंधळ झाला होता. तसेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेधही केला होता. अखेर शुक्रवारी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या वक्तव्याबाबत लोकसभेत माफी मागितली. दरम्यान, भाजपच्या संसदीय तसेच संरक्षण समितीतून प्रज्ञा ठाकूर यांना बाहेर काढण्यात आले आहे.


Previous article‘दबंग-३’ चित्रपट अडचणीत
Next articleआयपीएल संघांवर भडकला राहुल द्रविड
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound