Home राजकीय विधीमंडळ पक्षनेते असल्यामुळे अजित पवारांवर विश्वास ठेवला : अमित शहा

विधीमंडळ पक्षनेते असल्यामुळे अजित पवारांवर विश्वास ठेवला : अमित शहा


amit shaha
 

मुंबई (वृत्तसंस्था) अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, असे स्पष्टीकरण असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे.

 

अचानक फिरलेल्या राजकारणावर पत्रकारांनी अमित शहा यांनी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते होते. सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने सुरुवातीला जेव्हा सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर अजित पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रावर देखील त्यांची सही होती. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असे शहा यांनी सांगितले.


Protected Content

Play sound