मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित हजर राहण्याची शक्यता आहे. स्वतः उद्धव ठाकरे राज यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणार असल्याचे वृत्त आहे.
ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण आता आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद असा दुहेरी आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी आहे. त्यामुळे या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.