मुंबई प्रतिनिधी । आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी असणार्या अजित पवार यांच्या भेटीसाठी पक्षाचे तीन ज्येष्ठ नेते दाखल झाले आहेत.
आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. ते आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी बसून आहेत. दरम्यान, त्यांना भेटण्यासाठी माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सुनील तटकरे हे दाखल झालेले आहेत. हे तिन्ही नेते अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी आल्याचे समजते. यासोबत अजित पवार यांनी बंडावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यास पक्ष त्यांच्यावर नेमकी काय कार्यवाही करणार याची माहितीदेखील त्यांना याप्रसंगी दिली जाऊ शकते.