Home Cities भुसावळ बियाणी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

बियाणी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
66

भुसावळ प्रतिनिधी । येथील बियाणी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका संगीता बियाणी, संचालक राजू पारख, प्रवीण भराडिया, बियाणी मिलट्री स्कूलचे मुख्याध्यापक डी.एम. पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सीस, यू.बी. निगम आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी कलागुण दर्शनांचा अविष्कार सादर केला.

संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून दहावीच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound