Home क्राईम दोन महिलांचा विनयभंग : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन महिलांचा विनयभंग : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
101

vinaybhang

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील विटनेर येते शेतात बांधावर बैलगाडी सोडली या कारणावरून दोन महिलांना शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार आज (दि.१८) दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वडील आणि मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विटनेर येथील एक महिला व तिची विधवा जाऊ आणि तिचा मुलगा हे आपल्या शेतात कांदा लागवडीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी शेतालगत असलेल्या बांधावर त्यांनी आपली बैलगाडी सोडली होती. दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास मधुकर अभिमन पाटील व भुरा मधुकर पाटील या दोघा नात्याने वडील-मुलगा असलेल्यांनी तेथे येऊन महिलेला बैलगाडी येथे का सोडली ? अशी विचारणा केली. तेव्हा हा शेतरस्ता तुमचा नाही, सामायिक आहे. असे महिलेने उत्तर दिल्याने त्याचा राग येवून त्या दोघांनी, दोघा महिलांचा अश्लील शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांचा विनयभंग केला
. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.


Protected Content

Play sound