मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने आज गिरगावात सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी यावेळी वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवसेना दक्षिण मुंबईच्या विभाग क्र. 12 च्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांचा आरोप आहे की, मेट्रोच्या कामांमुळे डंपर 24 तास सुरु आहेत. त्यामुळे परिसरात भयंकर ट्रॅफिक जॅम होते. डंपरमुळे अपघात होतात. आवाज आणि गोंगाटामुळे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत, जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग संपकाळ यांनी दिला आहे.