Home क्राईम लष्कराच्या ताफ्यावर हल्ला : एक जवान शहीद ; दोन जखमी

लष्कराच्या ताफ्यावर हल्ला : एक जवान शहीद ; दोन जखमी

0
101


attack on army vehicle

श्रीनगर, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. येथील अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली. जवानांची एक तुकडी लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत असताना हा संशयास्पद स्फोट झाला, असे वृत्त लष्करी सुत्रांच्या हवाल्याने प्राप्त झाले आहे.

 

या भीषण स्फोटात तीन जवान गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारांदरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरच्या पलांवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरण्यात आली होती. लष्कराचा ट्रक या स्फोटकांच्या संपर्कात आल्याने त्याचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली, असे या संबंधित वृत्तामधून कळते आहे.


Protected Content

Play sound