Home Cities जळगाव जळगावात तेली समाजाच्या द्वितीय राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन (व्हिडीओ)

जळगावात तेली समाजाच्या द्वितीय राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन (व्हिडीओ)

0
104

vadhu var melava

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे ला.ना. विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात आज (दि.१७) तेली समाजाच्या द्वितीय राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला संपूर्ण राज्यातून विवाहेच्छुक तरुण-तरुणी व त्यांचे पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

 

मेळाव्याच्या स्थानाला श्री रामचंद्र शेठ नामदेव चौधरी (उत्राणकर)नगर असे नाव देण्यात आले असून अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेश सीताराम चौधरी हे आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजूमामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष नामदेव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound